#htmlcaption1

Trivikram Jal

अभिमंत्रित त्रिविक्रम जल 



 ह्या अभिमंत्रित जलापासून कोणीही वंचित राहणार नाही. आपण प्रथम ह्याचे नियम जाणून घेऊ या. नियम म्हणजे त्रिविक्रमाचे प्रेम आणि आदिमातेची कृपा, प्रेम व क्षमा.

हे अभिमंत्रित त्रिविक्रम जल स्नान करण्यासाठी आहे. स्नान करतान दोन थेंब पाण्यात (बादलीत) टाकायचेत की मग सगळ पाणी चार्ज होणार. जे कोणी शॉवरने आंघोळ घेत असतील त्यांनी, स्टील/पितळ ह्यापैकी कुठल्याही धातूच्या तांब्या घ्यायचा त्याच्यात पाणी घेऊन दोन थेंब ह्या जलाचे टाकायचेत मग टाळू, चेहरा, कंठकूपचक्र (विशुद्धचक्र), मस्तक (आज्ञाचक्र) कपाळावर मध्यभागी ह्या भागांना ते पाणी लावायचं.

हे पाणी मंगळवारपासून वापरायला सुरुवात करायची आहे. जेव्हा हे जल वापरणार त्यादिवशी त्या बाटलीतले सगळे पाणी संपवायचे, दुसर्‍या दिवशीसाठी पुन्हा त्यात पिण्याचे पाणी बाटलीत (३०ml ची बाटली) भरायचे. बादलीत दोनपेक्षा जास्त थेंबही टाकू शकता.

तुम्हाला इतर कोणाला हे जल द्यायचे असेल तर, त्यांच्या बादलीत दोन थेंब टाका आणि बाटली परत घेऊन या. कारण ती बाटली अभिमंत्रित गुहा तयार होणार आहे. ही गुहा रोज भरायची, रोज संपवायची. ही बाटली फक्त एका वर्षापर्यंतच चार्ज राहील.

एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्‌मध्ये बाटली चार्ज करून घेण्यासाठी आणायची. गुरुक्षेत्रम्‌मध्ये येऊन एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा .मग अकरा वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रंम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ हा मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा.

जे इथे नाहीत त्यांच्यासाठी मी इथे एक बाटली चार्ज करून ती गुरुक्षेत्रम्‌मध्ये ठेवणार आहे. समजा तुम्ही चार्ज केलेली बाटली चुकून फुटली तर, नवीन बाटली घ्यायची एकदा गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा की ती बाटली आपोआप चार्ज होईल.

जल विकायचा प्रयत्न केला तर त्याची power जाणार. पाण्यात कसलाही व्यवहार चालणार नाही. त्रिविक्रमने तुम्हाला जल विकलेलं नाहिए. जल विकलंत तर, जल विकणारा आणि विकत घेणारा दोघांसाठी ही ह्या पवित्र जलाचा उपयोग ह्या जन्मासाठी संपलेला असेल. ज्यांची इच्छा नाही त्यांना हे जल देऊ नका. ज्यांचा भाव आहे त्यांनाच द्या.

समजा एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्‌ला यायला नाही मिळाले तर, एक महिना उशीर झाला तर ११ ऐवजी २२ वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ मंत्र म्हणायचा.

कुठलीही गोष्ट ह्या बाटलीला बाधित करू शकणार नाही. स्त्रियांना मासिक पाळी असतानाही ह्या जलाने आंघोळ केली तरी चालेल. सुतक आहे, सोयर आहे काहीही problem नाही.

समजा उंदीर मुतला बाटलीवर. शांतपणे बाटली धुवायची सद्गुरूंचं नाव घ्यायचं पाणी पुन्हा अभिमंत्रीत होणार. त्याच्यासाठी सगळी बाळचं आहेत. चुकून कितीही मोठी चूक केली तर सांभाळायला मी समर्थ आहे तो बाप आहे, सख्खा बाप आहे.

ह्या मंत्रात जे दिलयं ते सगळं जल करणार.

 बेसिकली आमची १) रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणार, २) मन:शक्ती वाढवणार ३) जीवन उत्सहाने जगण्यासाठी प्राण आवश्यक आहे. प्राणाला कार्य करण्याची प्रेरणा देणार. प्राणाला, मनाला रोगप्रतिबंधक शक्ती पुरवणार आहे.

आंघोळ करताना ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्‌ । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ ह्या मंत्राबरोबर ‘ॐ ग्लौं सद्‌गुरुनाथाय नम:’ म्हटलं तर अधिक चांगलं.
हातून कधी चूक घडली तर, शांतपणे पाण्यात दोन थेंब हे जल घाला, आणि सद्‌गुरुचं नाव घेत आंघोळ करा, तिथल्या तिथे सगळं नाहीस होईल.

हे जल नीट जतन केले तर पिढ्यान्‌पिढ्या तुम्ही हे जल पुढे देणार आहात.

माझ्या सध्याच्या उपासनेची प्रथम निष्पत्ती हे जल आहे. आज अभिमंत्रित केलेली ही बाटली अडीच हजार वर्षे गुरुक्षेत्रम्‌मध्ये असणार आहे.
 संदर्भ : परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०६.०३.२०१४)

॥ हरि ॐ॥
For More Details Visit : http://www.manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=100&lang=4

0 comments: