सप्तमातृका पूजन
परमपूज्य बापू म्हणाले, “ब्रह्मर्षींमध्ये पहिल्यांदा आई झालेल्या लोपामुद्रा (अगस्त्य ऋषींची पत्नी) आणि अरुंधती (वसिष्ठ ऋषींची पत्नी) हया एकाच वेळेस प्रसूत झाल्या. अगस्त्य-लोपामुद्रा व वसिष्ठ-अरुंधती, ह्या चौघांनी आपापल्या बाळांचे जे पहिलं पूजन केले त्याला ’सप्तषष्ठी पूजन’ म्हणून संबोधण्यात आले.
मातृवात्सल्यविंदानम् मध्ये आपण वाचतो की शुंभ-निशुंभ ह्या राक्षसांशी लढण्याची वेळ आल्यावर महासरस्वतीच्या मदतीसाठी सगळे देव आपापल्या शक्ती पाठवतात. त्या सात शक्ती म्हणजेच सप्तमातृका व त्यांची सेनापती आहे काली. त्या सात मातृकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१) माहेश्वरी – जी पंचमुखी आहे आणि वृषभावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात त्रिशूळ आहे.
२) वैष्णवी – जी गरुडावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, गदा आणि पद्म आहे.
३) ब्रह्माणी – जी चार मुख असलेली आहे आणि हंसावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात कमंडलू व अक्षमाला आहे.
४) ऐन्द्री – जी इंद्राची शक्ती आहे आणि ऐरावतावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र आहे.
५) कौमारी – जी सहा मुख असलेली आहे आणि मोरावर आरूढ झालेली आहे.
६) नारसिंही – जिचे मुख सिंहीणीचे आहे. तिच्या हातात गदा व खडग् आहे.
७) वाराही – जिचे मुख वराहाचे आहे व जी पांढऱ्या रंगाच्या रेड्यावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, खडग्, तलवार व ढाल आहे.”
0 comments: