परमपूज्य सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंना श्रद्धावानांकडून अपेक्षित असलेल्या नऊ गोष्टी
परमपूज्य सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंना श्रद्धावानांकडून अपेक्षित असलेल्या नऊ गोष्टी
(अग्रलेख : दै. 'प्रत्यक्ष' दि. ३० ऑगस्ट २००९) :
कुणीही 'आम्ही सदगुरुंचे लाडके आहोत, विश्वासू आहोत,
श्रेष्ठ साधक आहोत' अश्या प्रकारे मिरवत असेल, तर प्रत्येक श्रद्धावानाला
त्या व्यक्तीचे वर्तन पारखण्याचा पूर्ण अधिकार आहे.कुणी कुठल्याही
अधिकारपदावर असेल व स्वत:स श्रेष्ठ साधक समजत असेल, तरीही त्याच्याकडे
पुढील गोष्टी असणे अत्यावश्यक आहे, हा माझा ठाम सिद्धांत आहे.
१) आह्निक दररोज दोन वेळा करणे.
२) आह्निक, रामरक्षा, सदगुरूगायत्री(अनिरुद्ध-गायत्री
३) बरोबरच्या व हाताखालच्या सहका-यांशी उन्मत्तपणे व
उद्धटपणे न वागणे. सहका-यांची किंवा हाताखालील व्यक्तींची चूक झाल्यास
त्यांना जरूर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये.
४) उपासनांच्या वेळेस त्या स्थळी असणा-या प्रत्येकाने
'आपण उपासनांच्या वर आहोत किंवा आपल्यास उपासनांची आवश्यकता नाही' असे
वर्तन करू नये.
५) बोलण्यापेक्षा, बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो हे माझ्या दॄष्टीने महत्वाचे आहे.
६) ह्या विश्वामध्ये कुणीही मानव 'आपण एकमेव अद्वितीय आहोत व आपली जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करु शकत नाही' , असे म्हणू शकत नाही व असे कुणीही मानू नये.
७) श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत.
८) चूक झाल्यास चूक सुधारण्याची तयारी पाहिजे.
९) परपीडा कधीच करता कामा नये।
माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, आपल्यासमोर
श्रीरामचरिताचाच आदर्श असला पाहिजे व त्यामुळे 'पावित्र्य हेच प्रमाण'
ह्याच मूलभूत सिद्धांतानुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ
गोष्टी ज्याच्याकडे नाहीत, तो माझ्या जवळचाच काय, परंतु दुरान्वयाने संबंध
असणाराही असू शकत नाही, हा माझा ठाम निश्चय आहे.तुमच्या हातात मी आज 'मला
काय आवडते व काय आवडत नाही' ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड
वापरूनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले
पाहिजेत.
मित्रांचा मित्र, अनिरुद्ध .
0 comments: