#htmlcaption1

Guru Pournima Utsav 2014

गुरुपौर्णिमा उत्सव २०१४



गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।गुरुरेव्‌ परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ॥

भक्ती व सेवेची सांगड घालून संसार व परमार्थ एकाच वेळेस आनंदाने करण्यासाठी, स्वत:चा समग्र विकास साधण्यासाठी मानवाला ओजाची, गुरुतेजाची गरज असते आणि सद्‌गुरुतत्वाकडूनच हे गुरुतेज प्रत्येकाला प्राप्त होते.

गुरुपौर्णिमेस सद्‌गुरुंच्या ऋणांचे स्मरण करुन दर्शन घेतल्यामुळे भक्त अधिकाधिक गुरुतेज सहजतेने प्राप्त करु शकतो. गुरुतेज स्वीकारण्यात येणारे अवरोध गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वणीस आपोआप गळून पडतात व गुरुतेजाचा अनिरुध्द प्रवाह प्रवाहित होतो, अशी गुरुपौर्णिमेची महती आहे.

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुध्दा आपल्या संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचा उत्सव शनिवार दि. १२ जुलै २०१४ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत श्री हरिगुरुग्राम, वांद्रे (पूर्व), मुंबई ह्या ठिकाणी साजरा केला जाईल.

दरवर्षीप्रमाणे या गुरुपौर्णिमेलाही श्रध्दावानांना खालील गोष्टींचा लाभ घेता येईल.

१. परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापू, नंदाई व सुचितदादा श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पूजन सकाळी करतील व त्यानंतर ह्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्व श्रध्दावानांना मिळेल.

२. परमपूज्य बापूंच्या मुळ सद्‌गुरुंच्या पादुका, पुर्वावधूत कुंभ व अपूर्वावधूत कुंभ म्हणजेच पहिला व २४ वा अवधूत कुंभ यांच्या प्रदक्षिणेचा लाभ सर्वांना घेता येईल.

३. श्रीत्रिविक्रम पूजनाचा लाभ सर्व इच्छूक श्रध्दावान घेऊ शकतील.

४. दिंडीमधून फिरणार्‍या पालखीमध्ये परम पूज्य सद्‌गुरु बापूंच्या पदचिन्हांवर प्रत्येक श्रध्दावानास मस्तक ठेवण्यास मिळेल.

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुध्दा गुरुपौर्णिमेच्या ह्या पावन दिवशी परमपूज्य बापूंचे दर्शन भक्तांना रात्री ९.०० वाजेपर्यंत घेता येईल. परमपूज्य बापू भक्तांकडून कधीच कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड, फळे, फुले, हार मिठाई, पैसे इत्यादि स्वीकारत नाहीत, ह्याची भक्तांनी कृपया नोंद घ्यावी.


0 comments: